
दैनिक चालू वार्ता मरखेल प्रतिनिधी -एकनाथ गाडीवान.
श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव संस्थेचे संस्थापक जनरल सेक्रेटरी कर्मवीर नागनाथ मारुती गडसिंग गुरुजी यांची 87 वी जयंती मित्र विद्यालय मळेगाव (ता.बार्शी) येथे उत्साहात साजरी करण्यात आली. उद्योजक लक्ष्मण पाचकवडे यांच्या हस्ते कर्मवीर गडसिंग गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पिसाळ होते.प्रमुख उपस्थिती म्हणून जनरल सेक्रेटरी सखुबाई गडसिंग,खजिनदार ज्ञानदेव आगलावे,उद्योजक सतीश वाघ,संचालीका नयना पाचकवडे,
सहसचिव हेमंत गडसिंग,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,संचालक लहू पाटील,सेनापती गडसिंग,शैलजा गडसिंग, विलास मिरगणे,काशिनाथ जाधव,प्राचार्य विकास बोराडे,सतीश चव्हाण,सुभाष तीकटे,मोहन घोरपडे,प्रतिभा पिसाळ,सोमनाथ कळसाईत,बी.आर.वाघमारे,
धनराज गफाट,नवाज तांबोळी उपस्थित होते.सकाळच्या पहिल्या सत्रात उद्योजक लक्ष्मण पाचकवडे,उपाध्यक्ष प्रमोद जगताप,चंद्रकांत आंबूरे,सूर्यकांत कापसे,अरुण सूर्यवंशी यांनी गडसिंग गुरुजींच्या शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकत आदरांजली वाहिली.द्वितीय सत्रात शिक्षक सहविचार सभा व उद्बोधन
वर्ग संपन्न झाला.यावेळी विलास मिरगणे बोलताना म्हणाले शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आपले कर्तव्य व जबाबदारी निष्ठेने पार पाडणे गरजेचे आहे.उपाध्यक्ष प्रमोद जगतात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज,संत गाडगे महाराज,शाहू महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श माननारे गडसिंग गुरुजी म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ होते.उद्योजक लक्ष्मण पाचकवडे यांनी विद्यार्थ्यांची सुरक्षितता,आरोग्य,स्वछता व गुणवत्ता विचारात घेत नर्मदेश्वर शिक्षण संस्थेस पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
अध्यक्ष विठ्ठल पिसाळ म्हणाले कर्मवीर भाऊराव पाटील,कर्मवीर जगदाळे मामा यांचा आदर्श घेऊन कर्मवीर गडसिंग गुरुजी यांनी मळेगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू केली.आज नर्मदेश्वर शिक्षण संस्थेमधून ग्रामीण भागात सर्वसामान्य बहुजन कुटूंबातील मुलांना उत्तम ज्ञानदानाचे कार्य केले जात आहे.गुरुजींचे आदर्श विचार,संस्कार सर्वजण पुढे घेऊन जाऊयात हीच खरी गुरुजींना आदरांजली होईल असे मत यावेळी व्यक्त केले.तिसऱ्या सत्रात पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर गव्हाणे यांचे अध्यक्षतेखाली सेवकांच्या पतसंस्थेची सहविचार सभा संपन्न झाली.संचालक विलास मिरगणे,प्राचार्य विकास बोराडे,पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गव्हाणे,गौस शेख यांनी सुशोभिकरणासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी संस्थेचे संचालक व पतसंस्थेचे संचालक,कर्मवीर फाउंडेशन यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे संचालक,प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक संचालक विलास मिरगणे,सूत्र संचालन शंकर आगलावे व आभार गौस शेख यांनी मानले.