
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर व बिलोली तालुक्यातील विविध वाळूघाटांतून उत्खनन करण्याची मुदत येत्या ९ जून सोमवार रोजी संपुष्टात येत असल्याने वाळू ठेकेदारांनी उत्खननाची घाई चालविली आहे. यासाठी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात येत आहेत. वाळू ठेकेदारांबरोबरच तपासणी पथकातील कर्मचारी आणि पोलीस यंत्रणेतील काही महाभाग यांच्याकडून देखील भर अब्दुल्ला गुड थैलीमे असा प्रकार सुरु झाला आहे. प्राप्त माहितीनुसार दोन्ही तालुक्यातील वाळू ठेकेदारांनी नदीपात्रालगत असलेल्या शेतामध्ये व इतर सोयीस्कर ठिकाणी वाळू साठवणूक करण्यास सुरुवात केली आहे. तसेच आर्थिक सहकार्यातून मिळविलेल्या संधीतून देगलूर शहर, ग्रामीण भागात देखील बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठवणूक केली जात आहे.
मुदत संपत आल्याने आता कोणत्याही प्रकारातून आर्थिक लाभ करून घेण्याची जणूकाही स्पधांच निर्माण झाली आहे.
बिलोली तालुक्यातून सहा ब्रास रॉयल्टी सुरु झाली आहे. आणि तेवढीच वाळू वाहतूक होत असलेल्या अनेक वाहनाला गस्तीच्या पोलीस पथकाकडून अडविण्यात येत आहेत व काहींना वसुलीसाठी तैनात करण्यात आले असल्याची चर्चा अनेक वाहन चालक व मालकांमध्ये सुरू आहे. तर दि. ३१ मे मंगळवारी मध्यरात्री ३ वाजता विना रॉयल्टीची वाळू वाहतूक होत असलेली दोन मोठे (ट्रका ) वाहने खानापूर फाटा येथील तपासणी पथकातील तलाठी, पोलिस कर्मचारी व रात्रपाळीच्या पोलीस गस्ती पथकातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून सोडून दिल्याची आहे.
चर्चा वाळू वाहतूकदारांमध्ये दिसून आली. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस निरीक्षक सोहम माछरे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ठेक्याचे दिवस भरत आल्याने आता रात्री अपरात्री देखील पूर्वीप्रमाणेच विना रॉयल्टी व ओरलोड वाळू वाहतूक
आठ दिवसापूर्वी शहरात नाथनगर भागात घरफोडीची घटना झाली. अंदाजे २ लाख रुपयांपर्यंत दागिने चोरीस गेले परंतु शहरातील भागात रात्रीची गस्त घालण्याऐवजी पोलीस कर्मचारी बैठे पथक चुकविण्यासाठी वन्नाळी सुगाव – इब्राहिमपुर-खानापूर जाहूर व चैनपूर ते कॅनॉल नाला ते खानापूर फाटा ते देगलूर आदी मार्गावरून येणाऱ्या वाळू वाहनावरच लक्ष केंद्रित करीत असल्याचे दिसत आहे. नदी पात्रालगत असणारी शेते आणि शहर व ग्रामीण भागात तपासणी केल्यास वाळू ठेकेदारांचे बिग बाहेर येण्याची शक्यता