
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
गिरवी तालुका माळशिरस येथील कुंभार परिवारच्या वतीने शंकर आंबादास कुंभार व आजिनाथ कुंभार यांनी नवीनच उद्योग समूह नातेपुते माळशिरस रोडवर चालू केलेला आहे. याचे उद्घाटन गुरुवार दिनांक 2 रोजी सामाजिक कार्यकर्ते भीमराव मोरे व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सुतार यांच्या शुभ हस्ते नूतन उद्योग समूहाचे उद्घाटन संपन्न झाले.
बाळासाहेब सुतार उद्घाटन प्रसंगी बोलत आसताना म्हणाले की कुंभार परिवाराचे आणि माझे आनेक दिवसापासून मैत्रीचे नाते आसल्यामुळे आज या ठिकाणी उद्घाटना साठी मला बोलवीले याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करीत आहे. या परिवाराने जोड धंदा म्हणून ऑटोमोबाईल्स उद्योग समूह चालू केला.या ठिकाणी दुचाकी मोटार सायकलचे सर्वच स्पेअर पार्ट विक्री व दुरुस्ती आणि टायर सर्व्हिस करून मिळणार. व सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आसल्या बद्दल आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी कुंभार परिवाराला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पत्रकार बाळासाहेब सुतार, भीमराव मोरे, पप्पू रणदिवे, गणेश मोरे, आंबादास कुंभार, अजिंक्य कुंभार, इत्यादी उपस्थित होते.
———————————–