
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पुणे: यशवंती प्रेरणादायी आधार सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजेश दिवटे लिखित ” झिरो ते हिरो एक प्रवास ” या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथील पत्रकार भवन मध्ये पार पडला या कार्यक्रमाला माजी सहकार आयुक्त तथा सहकार सचिव महाराष्ट्र राज्य अँड.एस.बी पाटील साहेब, जी.एस.टी निरीक्षक अधिकारी डॉ. प्रेमीला तळवाडकर, लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळाचे सभापती संजय अडसुळे साहेब, आदर्श शिक्षक बाबासाहेब मिसाळ सर, अहिल्या भूषण अनिल भालेकर साहेब इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्या मध्ये अहिल्याभूषण पुरस्कारांमध्ये विलास नेमाने,संभाजी शेळके, अंकुश गवळी, तर आदर्श शिक्षक पुरस्कार संजय जगताप ,राजेंद्र सगर,राजेंद्र राऊत.
तर समाजभूषण पुरस्काराचे मानकरी राम सगर,किशोर महाराज फुले ,राजेश राठोड जयवंत सावळे,मंगेश काळे, संजय तायडे, शारदा भस्मे, राजेंद्र कडू इत्यादी मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच झिरो ते हिरो या पुस्तकांमधील बबन शिंदे,सचिन म्हसे, तानाजी मराठे, गणेश पुंडे, या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संयोजन अंकुश शिरसागर आकाश दिवटे,हरिनाथ कांबळे,विठ्ठल शिंदे,दिनेश कुऱ्हाडे तर सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले.