
दैनिक चालु वार्ता पिंपरी प्रतिनिधी परमेश्वर वाव्हळ
पिंपरी: महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील व राजापूर तालुक्यातील खारेपाटण येथील शेजवली गावामधे प्रबुद्धनगर या वस्ती पासून १ किमी अंतरावर हा विशालकाय स्तूप अखंड दगडात कोरलेला आहे. मार्च २०१८ रोजी इतिहासाचे अभ्यासक व कोकण इतिहास परिषदचे सदस्य आयु रणजित हिर्लेकर यांनी या स्तुपाचे संशोधन केले. आज ह्या स्तूपाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले गेले नाही. अशी खंत बुद्ध लेणी संवर्धन समितीने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा एकमेव स्तूप होय. कोकण ह्या भागात प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळात किंबहुना सम्राट अशोक यांच्या अगोदर बौद्ध धम्माचा प्रचार झाला होता. सम्राट अशोक यांच्या काळात संघरक्षित नावाच्या भिक्खूना बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तिसऱ्या धम्मसंगती नंतर पाठवण्यात आले होते. त्या सोबतच महाराष्ट्राचे ग्यात राजे सातवाहन यांच्या काळात मोठ्या प्रमाणात कोकण तसेच संपूर्ण महाराष्ट्रात लेण्यांची निर्मिती झाली आहे. याच काळात मोठ्या प्रमाणत व्यापारी वर्ग व व्यापारी मार्गांची निर्मिती झाली होती. श्रेष्ठी,धनिक यांच्या माध्यमातून लेण्या निर्माण करण्यासाठी मोठ्या संख्येने दान मिळत होते. त्याच प्रकारे शेजवली गावातील हा स्तूप आणि लुप्त झालेला लेणी समूह यांचे निर्माण कार्य झाले असावे.असा दावा समितीने केला आहे. चोल या व्यापारी बंदरावरून संपूर्ण देशांतर्गत तसेच जगासोबत मसाले पदार्थ,सुगंधी द्रव, मूल्यवान वस्तू यांचे आयात निर्यात होत असत राजापूर हे देखील व्यापारी बंदर होते. जे व्यापारी केंद्रासोबत जोडलेले होते. खारेपाटण येथून ही वाट सुख नदी च्या द्वारे कराड ह्या ठिकाणापर्यंत गेली आहे. शेजवली येथील हा विशालकाय स्तूप आपल्याला राजस्थान येथील झालावाड जिल्यातील कोलवी बुद्ध लेण्यांची आठवण करून देतो. जो आकाराने २० फूट उंचीचा असून १०-१२ फूट लांबीचा आहे. हा एक पूर्णाकृती स्तूप होता. ज्यामध्ये प्रार्थना स्थान म्हणून एक कक्ष निमार्ण करण्यात आले होते. जे साधारणपणे ४ × २ फूट चे असावे. स्तूपणार वेदिकापट्टी स्पष्ट दिसून येते. आणि हार्मिकेतील चौकार आकाराचा छतावली सोबत जोडणारा भाग खालच्या दिशेला कोसळून पडलेला दिसतो. हार्मिका आजही सुस्थितीत असून हा स्तूप देखील तितकाच सुंदर असावा. नैसर्गिक आपत्तीचा मारा ह्या स्तूपावर आणि लुप्त झालेल्या लेण्यांवर आपल्याला पाहायला मिळतो. हा स्तूप सोडले तर कोणतेही स्थापत्य ह्या ठिकाणी सापडत नाही आणि फक्त स्तूप ओटिव स्तूप असणे थोडे शंकादायक वाटते. या भागात मोठ्या प्रमाणात लेण्या असू शकतात. असा अंदाज बुद्ध लेणी संवर्धन समितीने व्यक्त केला आहे.