
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग द्वारे माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी , जल , वायू , अग्नी व आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारितस्थानिक स्वराज्य संस्थाची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्ध अंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये “औरंगाबाद महनगरपालिकेला रविवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित मुंबईच्या टाटा थिएटर मध्ये आयोजित कार्यक्रमात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार शहरासाठी प्रशासक व आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांनी अन्य अधिकारी व भागधारक ह्यांचा सोबत महाराष्ट्राचे उप मुख्य मंत्री श्री अजित पवार, महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे ह्यांचा कडून स्वीकारले.मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. आस्तिक कुमार पांडेय यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल व या पुरस्कारा मुळे शहराच्या गौरवात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेल्या बद्दल शहराचे मा. महापौर श्री. नंदकुमार घोडेले साहेबांनी श्री. आस्तिक कुमार पांडेय यांचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी समवेत शहराचे पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता ग्रामीण पोलीस आधीक्षक श्री. कलविनिया संभाजीनगर पुर्व शहरप्रमुख श्री.बाळासाहेब थोरात नगरसेवक किशोर नागरे इत्यादी ची यावेळी उपस्थिती होती.