
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
सामाजिक शैक्षणिक राजकीय अन्याय अत्याचार व महागाई विरोधात सतत अग्रेसर असल्याने पक्षाने घेतली दखल
___
मागील सतत सात ते झाड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहून सातत्याने नांदेड दक्षिण मतदारसंघात युवकांची मोट बांधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गाव खेड्या पर्यंत पक्षाचे ध्येय धोरणे, विचार रुजविले व पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे काम केल्याची दखल घेत पक्षातील वरिष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविली आहे. नांदेड दक्षिण मतदारसंघात सामाजिक व राजकीय शैक्षणिक , महागाई केंद्र सरकारच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने करत असणारे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक युवा कार्यकर्ते लक्ष्मण फुलझळके यांची पक्षातील वरिष्ठांनी दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात केली.
दि. ४ जून रोजी जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेस पद नियुक्तीची बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली व युवकचे जिल्हाध्यक्ष धनाजी सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन कार्यकारिणी निवड बैठक घेण्यात आली. या बैठकीला नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक आशाताई भिसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा नांदेड पक्ष निरीक्षक निशांत वाघमारे,माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
माझ्यावर पक्षाने टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पडणार असून पक्षाचा विचार घराघरात आणि राष्ट्रवादी मनामनात या प्रमाणे पक्ष हित व पक्ष वाढीसाठी वरिष्ठांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे मत नवनियुक्त युवकचे सरचिटणीस लक्ष्मण फुलझळके व्यक्त केले.
या निवडीबद्दल नांदेड दक्षिण मतदारसंघासह जिल्हाभरातुन त्यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.