
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील पुणे, मुंबई व नागपूर तसेच अन्य शहरातील परदेशात उच्च शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार. र्आथिक, आरोग्य वा अन्य कारणांमुळे जे विद्यार्थी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत अशांना आता भारतात राहूनच परदेशांतील विद्यापीठाची पदवी प्राप्त करणे सहज शक्य होणार आहे .
यासंदर्भात एक खास योजना विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने आखली आहे. यासाठी एका विशेष मंडळाची विद्यापीठाचा स्थापना केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ परदेशी अभ्यासक्रम पूर्ण करावा अशी अटही नाही . जर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील काही भाग परदेशी विद्यापीठाकडून पूर्ण करायचा असेल तर त्यांना तशी मुभाही दिली जाणार आहे. विशेष म्हणजे त्याचे क्रेडिटस् येथे ग्राह्य धरले जातील, असे आयोगाने म्हटले आहे.
मोदीच्या सरकारच्या या निर्णयाचे देशभरात स्वागत होत आहे.