
दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :तालुक्यातील मौजे येनोरा येथे रविवारी पर्यावरण दिनानिमित्त बांबू वृक्ष लागवडी करण्यात आली.
यानिमित्त गावातील सर्व शेतकऱ्यांना बांबू वृक्ष
लागवड विषयी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज
करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी समितीचे अध्यक्ष गायकवाड सरपंच विष्णू व कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी जी. एम. सोनकांबळे, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ, मंडळ कृषी अधिकारी माने, मंडळ कृषी अधिकारी आष्टी सांगवे, कृषी पर्यवेक्षक कांबळे, कृषी सहाय्यक इंजेवाड, प्रगतशील शेतकरी नितीन जोगदंड, गीताराम भूबर, सुरेश भूबर, अर्जुन दवंडे, सुभाष भुंबर, नारायण गायकवाड, संदीप गायकवाड, पांडुरंग भुंबर, कैलास साळवे, कृषी सहाय्यक विजापूरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.