
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
सदरील शेत रस्त्याचे काम स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा होत आहे परंतु संबंधित कामांचे ठेकेदार हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असून त्यांना वेळोवेळी ईस्टीमेंट नुसार काम करण्यास व कामांचा दर्जा सुधारण्यासाठी कित्येक वेळा सूचना केल्या परंतु तुम्ही कुठेही तक्रार करा माझं कोणी काही करू शकत नाही ह्या पद्धतीची भाषा वापरत आहे.
संतोष बोरुडे
सरपंच पखोरा
संबंधित रस्त्याचे काम हे पंधरा ते वीस टक्के झाले असून रस्त्याच्या कामास प्रत्यक्षात भेट दिली जाईल व त्यावेळी ग्रामस्थांना बोलविल्या जाईल.रस्त्याचे काम हे इसटीमेट नुसार सुरू आहे त्याची पडताळणी केली जाईल तसेच वारंवार संबंधितांना सूचना देखील केल्या आहे.
कल्याण हत्ते
कनिष्ठ अभियंता
गंगापूर– पखोरा (ता.गंगापूर) येथील पखोरा ते जुनी पुरी या पन्नास चोपन्न हेड अंतर्गत होत असलेल्या रस्त्यांचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांनी पत्राद्वारे बांधकाम विभागाला कळविले आहे.सदरील रस्त्याच्या कामाचे ठेकेदार शैलेश खांडे तसेच प्रदीप नरके यांना वारंवार सांगून देखील रसत्याचे काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचा घणाघाती आरोप पखोरा ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये पातळ स्वरूपाचा खडीचा व मुरुमाचा थर आच्छादित केला असून व्यवस्थित दबाई न करता बिल काढण्याच्या स्वार्थापोटी थातूरमातूर काम चालू असल्याचे पत्रामध्ये म्हटले आहे. बांधकाम विभागाच्या कार्यालयामार्फत कनिष्ठ अभियंता हत्ते व विरगावकर यांना देखील निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले होते,परंतु संबंधित मनमानी ठेकेदाराने त्यांच्या ही आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. पावसाचे दिवस जवळ आले असून सदरील रस्ता हा अंदाजपत्रकानुसार हवा अन्यथा रस्त्याचे काम बंद पाडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.