दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई | महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणलेत.
निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं आहे.
भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला. त्यांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेने 2019 साली भाजपला जनमत दिले होते. मात्र, आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले. मात्र, अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते हे आजच्या विजयाने स्पष्ट झाल्याचं फडणवीस म्हणालेत.
दरम्यान, भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती.
भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहे. तर धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे. तर महाविकास आघाडीचे संजय राऊत, प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी हे तिन्ही उमेदवार विजयी झाले.
