
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
सातारा तालुका पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सन्माननीय विश्वजीत घोडके साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहांत संपन्न. संभाजी पुरीगोसावी आणि मा . घोडके साहेब यांचा लातूर जिल्हांपासून चांगलेच परिचयांचे आहेत. घोडके साहेब हे मूळचे पुणे जिल्ह्यांतील असून त्यामुळे त्यांना सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांची चांगलीच माहिती होती. महाराष्ट्रांच्या पोलीस दलांतील शांत, संयमी तितकेच दबंग व सर्वांशी मिळून, मिसळून काम करणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पोलीस निरीक्षक घोडके साहेब यांनी लातूर जिल्हांसह सातारा जिल्हा पोलीस दलांतील पुसेगांव पोलीस ठाणे , वाठार पोलीस ठाणे, अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी आपले कर्तव्यदक्ष काम पाहिले त्यानंतर त्यांची बदली पुणे सीआयडी विभागांत झाली. त्यानंतर पुन्हा सातारा जिल्हा पोलीस दलांत काम करण्यांची संधी मिळाली. माननीय पोलीस अधीक्षक मा .अजयकुमार बंन्सल यांच्या आदेशावरुन त्यांना सातारा तालुका पोलिस पोलीस स्टेशनचा कार्यभार सोपविण्यांत आला. घोडके साहेबांनी तत्काळ सातारा तालुका पोलीस स्टेशनचा पदभार हाती घेतला. तालुका पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारताच जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांचे स्वागत व अभिनंदन केले होते. त्यांनी सातारा हद्दीमधील गुन्हेगारींवर त्यांनी पोलीस ठाण्यांतील आपल्या सहकार्यांसोबत चांगलाच वचक ठेवुन गुन्हेगारींवर चांगलाच आळा घातला आहे. त्यांच्या आज अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त मा .पोलीस अधीक्षक , मा.अप्पर पोलीस अधीक्षक , मा. सहायक पोलीस अधीक्षक यांच्यासह सातारा जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी पोलीस व पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार क्षेत्रातील संपादक तसेच सर्व प्रतिनिधी मित्रपरिवार राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांतील अशा विविध अन्य मान्यवर मंडळींनी समक्ष व सोशल मीडियावरुन सन्माननीय कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा. विश्वजीत घोडके साहेबांना अभिष्टचिंतन सोहळा निमिंत्त शुभेच्छा दिल्या यावेळी साहेबांनी समक्ष व सोशल मीडियावरुन शुभेच्छा स्वीकारल्या.