
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
धनेगाव :- नांदेड तालुक्यातील धनेगाव येथून २० वर्षा पासून पायी दिंडी सोहळ्याची परंपरा चालू आहे. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी धनेगाव नांदेड येथून पं. पु. श्री. संत गाडगेबाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व वै.श्री.ह भ.प.गुरुवर्य मामासाहेब महाराज मारतळेकर , वै.श्री.ह.भ.प.माधवराव महाराज जाधव धनेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवर्य रावसाहेब महाराज, नारायणराव समदुरे,गोविंदराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळा दिनांक १५/०६/२०२२ रोज बुधवार दुपारी १२ वाजता निघणार आहे. धनेगाव नांदेड – परळी वैजनाथ – मन्मथस्वामी – आपेगाव – पैठण – नेवासा – शनिशिंगणापूर – सोनाईदेवी-शिर्डी साईबाबा-नाशीक-पंचवटी -राममंदिर-त्र्यबंकेश्वर – भीमाशंकर-देहूभीमाशंकर-
देहू (आळंदी) -पंढरपूर पायी दिंडी निघणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे असे समस्त गावकरी मंडळी धनेगाव यांनी कळविले आहे संपर्कासाठी मोबाईलनंबर ९७६७७३४३०३
सुनील जाधव धनेगाव.