
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलढाणा: दि. १२ . अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असलेल्या पतीची पत्नीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. धक्कादायक म्हणजे ही हत्या करण्यात आरोपी पत्नीला तिच्याच अल्पवयीन मुलाने सुद्धा मदत केल्याची माहिती समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात येणार्या भुमराळा गावात प्रियकर आणि स्वतःच्या मुलाच्या साथीने एका महिलेने स्वतःच्या नवऱ्याची हत्या केली आहे.
आरोपी महिलेने आपला अल्पवयीन मुलगा आणि प्रियकर ज्ञानदेव आघाव या दोघांच्या मदतीने पती रामदास सरकटे यांची हत्या केली. दोरीने गळा आवळून हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न प्रियकर ज्ञानदेव आघाव यांच्या साहाह्याने पती रामदास सरकटे यांची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह विहिरीत नेऊन टाकला.
आरोपींनी फिल्मी स्टाइल हा संपूर्ण प्रकार करून पुरावा नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी केवळ बारा तासांच्या आत या संपूर्ण घटनेचा छडा लावला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.