
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – राज्यातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य युवक किसान संघटना नावाची ग्रामीण भागासाठी विशेषता शेतकरी ग्रामीण तरुण महिला इत्यादींसाठी विधायक काम करणारी ही संघटना असल्याचे वरिष्ठांनी संगीतले आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांनी एकत्र येऊन आपण ज्या समाजातून येतो त्या समाजासाठी काहीतरी करावं यासाठी ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटने मध्ये अनेक कृषी पदवीधर इंजिनीयर डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती असतील ज्यांची नाळ ही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. ही संघटना ग्रामीण भागात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी काम करेल शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे उत्पन्न वाढवणे शेतमालाचा दर्जा उंचावणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्राचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे तसेच नवनवीन नोकऱ्यांच्या संधी ग्रामीण तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे ग्रामीण आरोग्याच्या संदर्भात अधिकच्या सोयीसुविधा कशा उपलब्ध होतील यासाठी व यासारख्या अनेक ग्रामीण भागातील प्रश्नांसंदर्भात काम करणारी ही संघटना असेल संघटनेने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ठरवल्याप्रमाणे राज्याच्या अध्यक्षपदी अमोल चोपडे उपाध्यक्षपदी राहुल खेमनर तसेच संकिता पगार घोगरे कार्याध्यक्षपदी साहिल फटांगरे संपर्कप्रमुख गणेश जोंधळे कोषाध्यक्षपदी पंकज भुसाळ हे असतील तर कोर कमिटीत संतोष शिंदे संतोष वैराळ विशाल पवार महेश डोळे सचिन अनर्थे तबरेज शेख चेतन पाटील इत्यादी महाराष्ट्रातील विविध भागातील व्यक्ती असतील या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे या संघटनेत सर्व पदाधिकारी हे उच्चशिक्षित असतील पुढील काळात संघटना गावोगावी जाऊन शेतकरी चर्चासत्र पीक स्पर्धा करियर मार्गदर्शनाची कार्यक्रम या माध्यमातून आपल्या कार्यक्रमास सुरुवात करील, तसेच संघटनेचा स्थापनेचा कार्यक्रम हा एक जुलै कृषी दिन रोजी पार पडेल शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती लावावी असे आव्हान पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.