
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे दिनांक 10 ते 12 जुन 2022 दरम्यान श्री. शिवछत्रपती अंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल ,बालेवाडी,पुणे.येथे राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. उदघाटन अध्यक्ष राज्य संघटनेचे अध्यक्ष-सलाउद्दिन अन्सारी, सचिव-संदीप गाडे, कोषाध्यक्ष-संदीप वाघचाौरे, सचिव संयोजन समिति- कैलास लबडेपाटील संयोजनसमिति सभासद- सुधीर गडलिंग,संजय शिंदे, योगेश मोरे हेमचंद्र गवई राजु जाधव व प्रसाद पवार तसेचपंच कमिटीचे प्रमुख-अनुप देठे, हरिदास गोविंद, अमित शहा, रवी सूर्यवंशी, रितेश नायर, ईत्यादीची उपस्थिती होती.
या स्पर्धेत तब्बल 1794 खेळाडू आप-आपल्या संघांसाठी झुंजतांनी दिसणार आहेत, या स्पर्धा जागतिक कराटे संघटनेच्या नियमावली नुसार सब-जुनियर, कॅडेट, जुनियर, अंडर-२१, आणि सिनियर
मुले व मुली अश्या वयोगटात तसेच वैयक्तिक कुमिते व काता आणि सांघिक कुमिते व काता अश्या प्रकारात खेळविण्यात येणार आहे.
या राज्य स्पर्धेतून पुणे येथे प्रथमच होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी संघ निवडल्ला जाणार आहे, तसेच महाराष्ट्रात बऱ्याच वर्षानंतर कराटेची राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेत संघटने कडून अचूक गुणतालिकेसाठी अंतरराष्ट्रीय डिजिटल तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रासाठी तांत्रिक प्रमुख म्हणून मुकेश बनकर, शुभम ढाकणे, कुणाल साळवे, कबीर कुलकर्णी आदी ब्लैक बेल्ट काम बघत आहेत. तत्पूर्वी या राज्य स्पर्धेसाठी क्रीडा संचालक सुहास पाटील, राजेंद्र घुले, राजू कोळी, शिवाजी साळुंके
आदिनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.