
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला!
मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिवसेनेला धारेवर धरले आहे. केंद्रोय मंत्री नारायण राणे यांनी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला दहा वर्षे मागे नेल्याची टीका त्यांनी केली आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांतील नाते उद्धव ठाकरेंनी धुळीला मिळवल्याचा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.
राज्यसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर सिंधुदुर्गात भाजपाने विजयोत्सव साजरा केला, त्यावेळी नारायण राणे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वीसही आमदार निवडून येणार नाहीत. शिवसेनेचे मुख्यमंत्री स्वतःला वाघ म्हणवतात, पण प्रत्यक्षात शेळीचीही कृती त्यांच्याकडून होत नसल्याची राणेंनी टीका केली आहे. तसेच येणारी महापालिका निवडणूक ही भाजपाच जिंकेल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला आहे.
यावेळी नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जेवढी मतं मिळायला हवी होती, तेवढी मत आघाडीला मिळालेली नाहीत. उद्धव ठाकरेंना सांगायच आहे की, सत्तेला यायला १४५ मते लागतात, तुम्ही अल्पमतात आलेले आहात. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या. सत्तेवर राहायचा उद्धव ठाकरेंना नैतिक अधिकार नसल्याचेही राणे म्हणाले आहेत.