
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे – राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा धक्का बसेल, असा नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही.
एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले ते मला ठाऊक आहे. ते मत महाविकास आघाडीचे नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
“शिवसेनेने लढवलेल्या सहाव्या जागेसाठी मतांची संख्या कमी होती. तिथे आमचा फरक वाढत होता. पण धाडस करत प्रयत्न केला. अपक्षांची संख्या भाजपाकडे अधिक होती, पण दोघांनाही पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजपला आम्हाला पाठिंबा देणारे जे इच्छुक होते त्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी भाजपने जी कारवाई केली त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे