
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:जिल्हाधिकाऱ्यांनी देगलूर नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेस मंजूरी दिल्यानंतर सोमवारी देगलूर नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांना नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड उपस्थित होते. २७ सदस्यांची संख्या असलेल्या या नगरपरिषदेत १४ जागा महिला सदस्यांसाठी, ४ जागा अनुसूचित जातीसाठी तर २ जागा अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये ३ सदस्यांचा राहणार आहे.
साधना प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीत शिकत असलेली विद्यार्थीनी दुर्गा विठ्ठल एम्बलवार व साधना हायस्कूल विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकत असलेला आदित्य विठ्ठल एम्बलवार या
विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी गंगाधर इरलोड यांनी दिली.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रमांक १.. अ) सर्वसाधारण महिला ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक २)
अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ अ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ४ अ ) अनुसूचित जाती महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ : अ) अनुसूचित जमाती, ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ अ ) अनुसूचित जमाती महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब) सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ८.. अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १० अ) सर्वसाधारण महिला, ब) सर्वसाधारण