
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
अनावश्यक खर्चाला फाटा देत विविध उपक्रमांची जोपासली जन्मदिनी बांधिलकी
लोहा : – सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारे सर्वांचे सर्वधर्मियांतील चाहते म्हणून ज्यांचा प्रकर्षाने उल्लेख केला जातो असे जनतेच्या हृदयावरील कोरले गेलेले एकच नाव म्हणजे करिम भाई शेख (शेठ) यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून लोहा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
लोहा शहरात ग्रामीण रूग्णालय शासकिय रूग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. जुना लोहा येथील शनी मंदिर देवस्थानचा अभिषेक व आरती करण्यात आली.बडेसाब येथील दर्ग्यात जावून चादर चढवण्यात आली असून समाजाचे काही देणे लागतो या उद्दात्त भावनेने लोहा शहरातील स्मशानभूमीत बसण्यासाठी आसन व्यवस्था अर्थातच सिमेंट च्या खुर्च्या भेट देऊन आपले कर्तव्य पार पाडले
यावेळी अनेक वर्षापासून शेकडो करिम भाई यांच्या वर प्रेम करणाऱ्या असंख्य युवकांनी, चाहत्यांनी लोहा शहरात मोठ मोठे होर्डिंग्ज लावून आपल्या सक्रिय चळवळीतील नेत्याला शुभेच्छा दिल्या.शहरातून भव्य अशी मोटार सायकल रॅली काढली.
यावेळी शिवराज दाढेल,आजिस कुरेशी, सलिमभाई शेख, शेशाक शेटे,अमोल शिंदे,पुजाजी शेवडकर,राम केंदे,नयुम शेख,निहाल लदाफ,इमाम शेख बेरळीकर, मैला शेख,अझर पेटल,गैसभाई पटेल,मोबीन शेख, अनेकांची उपस्थिती होती. .