
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
पूर्ण जागा जिंकत एकहाती सत्ता , ८० वर्षाच्या आजीबाईंचाही विजय
सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था [सोसायटी] वर गोकुळ आहेर यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द करत अनिल आहेर,बाळासाहेब जगधने यांच्या परिवर्तन गटाचा पराभव करत पूर्ण १२ जागेवर विजयश्री खेचून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे.
पेंडेफळ सोसायटीसाठी दिनाक १४ रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यात ३१८ मतदारांपैकी ३०८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यात सभासदांनी गोकुळ आहेर यांच्या बाजूने कौल देत पूर्ण १२ जागा विजयी करून दिल्या.
विशेष म्हणजे या निवडणुकीच्या आखाड्यात ८० वर्षे वयाच्या आजीबाई देखील उतरल्या होत्या त्यांचा देखील विजय झाला आहे.
सर्वसाधारण मतदार संघातून इंदुबाई कचरू आहेर या आजींनी १५५ मतदान घेत विजय मिळवला आहे.तर याच गटातून कृष्णा मन्सूब आहेर [१७२] गोकुळ पंढरीनाथ आहेर [१७७],चांगदेव राजाराम आहेर [१५३], बापू मन्सूब आहेर [१६८], भाऊसाहेब नाना आहेर [१४९], महेश भाऊसाहेब आहेर [१४६], राजाराम बाजीराव चव्हाण [१५३] महिला राखीव मतदार संघातून
इंदुबाई गोकुळ आहेर [१७९], शोभाबाई नानासाहेब आहेर [१६४] , इतर मागासवर्गीय मतदार संघातून वनमाला कडूभाऊ आहेर [१६९] , अनु जाती अनु जमाती मतदार संघातून यशवंता पुंजाबा पठारे [१७४] मतदान घेऊन विजयी झाले.