
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक , मुख्याध्यापक , शालेय समिती व कर्मचारीवृंद यांनी शिक्षण अधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार वटपौर्णिमाच्या दिवशी पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
वटवृक्ष हे झाड राष्ट्रीय वृक्ष म्हणून गणले जाते. त्याला कायद्याने संरक्षण नाही. वटवृक्षाचे झाड आधारवड किंवा तो विस्तार वृक्ष आहे. वडाच्या झाडातून मिळणारा ऑॅक्सिजन मानवासोबत पशुपक्ष्यांना जगण्याचे बळ देतो. वटवृक्षाची झाडे ५०० ते ६०० वर्षे जगू शकतात. वटवृक्षाच्या काड्या यज्ञासाठी वापरल्या जातात. आयुर्वेदीय औषधी गुणधर्म अनेक आहेत. अशी वडाची उपयुक्तता मोठी आहे. त्यामुळे वडाच्या झाडाला संरक्षणाची गरज आहे. त्याच्या संवर्धनाचा भाग म्हणून पारंब्यापासून तयार होणारे नवीन वटवृक्षांची लागवड व्हावी, त्याची जोपासना व्हावी, असे प्रतिपादन यावेळी मुख्याध्यापक एम.डी . बटलवाड यांनी केले.
वटवृक्षाच्या वृक्षारोपणास शालेय समिती अध्यक्ष भरत पवार , मुख्याध्यापक बटलवाड , सहशिक्षक ई बी.गौड सहशिक्षका श्रीमंगले , तसेच अंगणवाडीच्या पाटील मॅडम , शाळेतील कर्मचारी , व विद्यार्थ्याची उपस्थिती होती.