
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रतिनिधी
विशेष सहाय्य योजने अंतर्गत विधवा, घटस्फोटित, परितक्त्या, दिव्यांग, अंतर्भूत पीडित आजारी व श्रावण बाळ योजना च्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचे २१ हजाराचे प्रमाणपत्र व हयात प्रमाणपत्रासाठी जळकोट तहसिल कार्यालयात जीवघेणी पायपीठ व गैरसोय होऊ नेय, वेळेची व पैशाची बचत व्हावी याकरिता जळकोट तालुक्यातील अतनूर तलाठी सज्जा अंतर्गत संगांयो, श्रावणबाळ सह अन्य योजनेच्या ज्येष्ठ महिला व पुरुषांनी येथील ग्रामपंचायत कार्यालय अतनूर येथे १६ जून रोजी, ग्रामपंचायत कार्यालय गव्हाण येथे दि.१६ जून रोजी, ग्रामपंचायत कार्यालय मेवापूर येथे दि.१७ जून रोजी, ग्रामपंचायत कार्यालय मरसांगवी व चिंचोली येथे दि.१८ जून रोजी सकाळपासूनच उपस्थित राहावे असे आवाहन अतनूर सज्जाचे कर्तव्यनिष्ठ व कर्तव्यदक्ष तलाठी अतिक शेख यांनी केले आहे.
विशेष सहाय्य योजने अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन, विधवा, दिव्यांग, अंतर्भूत पीडित आजारी सह अन्य योजनांसह अन्य लाभार्थ्यांना दि.३० जून पर्यंत २१ (एकवीस )हजार रुपयांचे तहसील कार्यालयाचा उत्पन्न दाखला व हयात प्रमाणपत्र सादर नाही केल्यास अनुदान बंद होणार असे पत्र जळकोट तहसीलदार सौ.सुरेखा स्वामी यांनी काढले आहे. तसेच सदरील लाभार्थ्यांचे गैरसोय होऊ नेय, तथा जीवघेणी पायपीट होऊ नयेत, वेळेची, पैशाची व इतर बचत सह गैरसोय होऊ नये म्हणून अतनूर तलाठी सज्जा अंतर्गत येणाऱ्या गावात जाऊन या तारखेला ग्रामपंचायत कार्यालयात मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी सामाजिक सर्व्हेशन अंतर्गत, आर्थिक परिस्थिती, शासकीय नौकरी, जायमोक्यावर जावून स्थळपाहणी, गृहचौकशी नंतरच २१ हजारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र योग्य नियोजनातून देणार आहेत. या कामी मंडळअधिकारी व्ही.एस.सूर्यवाड, अव्वल कारकुन शिवराज एम्प्ले, तलाठी अतिक शेख काम पाहणार आहेत.