
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा तालुक्यात कॉमर्स शाखेचा ब्रॅन्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्तव्य कॉमर्स क्लासेस मधील विद्यार्थी कु. वैष्णवी तिडके व तसेच कु. ज्योती लांडगे या दोन्ही विद्यार्थिनींनी 100 पैकी 99 गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
तसेच कु. वैष्णवी हिलाल व हनुमान मोहिते या दोन्ही विद्यार्थ्यांनी 100 पैकी 98 गुण घेऊन महाराष्ट्रात दुसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे.
तसेच कु.संध्या भुजबळ, कु.राजनंदनी भदाडे व कु.आर्चना तेलंग या तिन्ही विद्यार्थ्यांनी 100 पैकी 97 गुण घेऊन महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
कर्तव्य कॉमर्स क्लासेस चे विद्यार्थी दरवर्षी तालुका किंवा जिल्ह्यातच नाही तर आपले व आपल्या क्लासचे नाव महाराष्ट्रामध्ये गाजवितात.
म्हणूनच कर्तव्य कॉमर्स क्लास बनला आहे लोहा तालुक्याच्या इतिहासात कॉमर्स शाखेचा सर्वोच्च निकाल देणारे एकमेव क्लास.
क्लासेस मध्ये अकाउंट्स या विषयांमध्ये 90 मार्क्सच्या वर गुण घेणारे 70 विद्यार्थी आहेत तसेच O.C. या विषयांमध्ये 90 मार्क्सच्या वर गुण घेणारे 57 विद्यार्थी आहेत.
75% ते 90% च्या दरम्यान 60 विद्यार्थी आहेत
लोहा तालुक्यात 90.33% गुण घेऊन तालुक्यात पहिला 89.67% गुण घेऊन तालुक्यात दुसरा व 88.67% गुण घेऊन तालुक्यात तिसरा ही कर्तव्यचेच विद्यार्थी आलेले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार क्लासेसचे संचालक प्रा. संतोष पाटील गायकवाड सर यांनी केला व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी कर्तव्य कॉमर्स क्लासेस ची संपूर्ण टीम संचालक प्रा. एस गायकवाड पा.सर, प्रा.संजय फाजगे सर, प्रा.एस राठोड सर, प्रा.शिवलिंग नागसाखरे सर व प्रा.सतीश बगाडे सर उपस्थित होते