
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर यांना राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर
—————————————-
मुंबई येथे दि. १७ जून मंत्रालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ८९१ व्या जयंती द्विपंधरवाडाचा भव्य समारोप सभारंभ व महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ” महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार ” वितरण सोहळ्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने सन २०१६ पासून वीरशैव लिंगायत समाजासह बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आदी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीस व एका संस्थेस महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार राज्यस्तरीय देऊन गौरव केला जातो.
यात शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे सर यांना प्रथम वर्षाचा २०१६-१७ चा उत्कृष्ट कार्य करणारी संस्था म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच २०१७-१८ चा अभय कल्लावार,२०१८-१९ विठ्ठल ताकबिडे नांदेड,२०१९-२०चा उमाकांत शेटे पुणे, २०२०-२१ राम ततापुरे लातूर २०२१-२२ साठी वाय . बी. सोनटक्के मुंबई आदीना जाहिर झाला असुन दि.१७ जून २०२२ रोजी वरील सर्व पुरस्कारांचे मुंबई मंत्रालय येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात वितरण होणार असुन या कार्यक्रमांचा उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार राहणार असुन या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, पाटबंधारे मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू आदी उपस्थित राहणार असुन तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त समाज बांधवांने व शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवा संघटना लोहा तालुका शाखेचे अध्यक्ष हनुमंत लांडगे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके मनोज शेलगावकर,, सरपंच कैलास धोंडे, शुभम घोडके, उपाध्यक्ष साधु पाटील वडजे,, अंकुश सोनवळे, सुर्यकांत आणेराव, राजू पिल्लोळे, रवि होळगे, चंद्रकांत बेद्रे , सामाजिक कार्यकर्ते बाबाराव शेठ आदीने केले आहे.