
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -अनिल पाटणकर
श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टने पुणे महापालिकेसोबत तळजाई येथे वृक्षारोपण केले आहे. तेथे वड, पिंपळ, औदुंबर तसेच आळंदीतील सुवर्ण पिंपळ असे पवित्र वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले आहे. यावर्षी मठात वटपौर्णिमेला महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कुंडीतील वडांच्या झाडांचे सुत्र वेष्टन करून पूजन केले. सदर झाडांचे तळजाई येथे रोपण व संवर्धन करण्यात येणार आहे.
पूजेसाठी आलेल्या महिलांना सातशे तुळशीची रोपे प्रसाद म्हणून मोफत वाटण्यात आली. तुळस ऑक्सिजन निर्मिती करते तसेच तुळस आयुर्वेदिक दृष्ट्या गुणकारी असून प्रत्येक घरात एक तरी तुळस असावी जेणेकरून कुटुंबाचे आरोग्य राखले जाईल. प्रत्येक महिलेने एका तरी रोपाचे संगोपन करावे हा संदेश यातून देण्यात आला.
सुरक्षित व भक्तिमय वातावरणात वटवृक्षाची पूजा करता आली. व्रत वैकल्यांची जपणूक वृक्षारोपणा सारख्या उपक्रमातून केल्याबद्दल महिलांनी विश्वस्त मंडळाचे आभार मानले.
या उपक्रमाचे आयोजन विश्वस्त मंडळ
श्री सुरेंद्र वाईकर (अध्यक्ष) श्री सतीश कोकाटे (सचिव), श्री राजाभाऊ सूर्यवंशी, श्री निलेश मालपाणी, श्री प्रताप भोसले यांनी केले होते