
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी: बाळासाहेब सुतार,
नीरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंहाच्या प्रवेशद्वारा समोरील बी के बी एन राज्य मार्गाचे आणेक दिवसा पासून थांबलेल्या कामाची बातमी दैनिक लोकमत मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे आज अखेर कामाला मुहूर्त मिळाला व काम चालू करण्यात आले. नरसिंहपूर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका नजीक लक्ष्मी नरसिंहाच्या प्रवेशद्वारा कडे जाणारा आंदाजे 300 मीटर काम पूर्ण झाले नव्हते. नरसिंहपूर परिसरातील सर्वच भाविकांची आर्धवट रस्त्याची एकच मागणी होती. तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन रस्त्याचे काम चालू झाले. लक्ष्मी नरसिंहच्या दर्शनाला येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होऊन दैनिक लोकमतचे भाविक भक्त आभार व्यक्त करीत आहेत.