
दैनिक चालू वार्ता किनवट-प्रतिनिधी –दशरथ आंबेकर
:-आज दिनांक १३/६/२०२२ रोजी दिव्यांग. विधवा,जेष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयामार्फत विविध योजने अंतर्गत मानधन देण्यात येथे,त्या अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिनांक २०/८/२०१९ च्या शासन निर्णयानुसार दरवर्षी उत्पन्न दाखल्याची अट लावण्यात आली. परंतु उत्पन्न दाखला लावल्याशिवाय कोणतीच योजनेचा लाभ भेटत नाही. तरी शासनाने दरवर्षी उत्पन्न दाखला सादर करण्यात यावा अशी अट लाऊन दिव्यांग,विधवा,ज्येष्ठ यांनां विविध योजनेचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची परेशानी होते आहे.त्या शासन निर्णयात बदल करूण हयात प्रमाण पत्राची अट रद्द करण्यात यावी या साठी मा.जिल्हाधिकारी नांदेड व मा.तहसीलदार किनवट यांना प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तालुका कार्यकारिणीच्यां वतीने अव्वल कारकून परमेश्वर मुंडे तहसील कार्यालय किनवट यांना निवेदन देण्यातआले. या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे ता.अध्यक्ष, भगवान मारपवार .सचिव शेख मुजीब,कोषाध्यक्ष शेख फेरोज,दशरथआंबेकर ईरेगावकर, शहरअध्यक्ष अब्दुल सलीम,नामदेव पेंडकर,प्रदुम्न,दिलीप बेलसरवार,मल्लकाबाई सुद्धेवाड यांच्यासह अनेक दिव्यांग व्रद्ध,विधवा, जेष्ठ नागरिक,निराधार लाभार्थी उपस्थित होते.ही अट शिथिल करून अपंग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.