
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
गेल्या दोन-तीन वर्षात कोरोनाच्या बंधनांमुळे आणि लॉकडाऊनमुळे सुवासिनींना वटपौर्णिमा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करणे अवघड झाले होते. मात्र, यंदा पहिल्यांदाच सुवासिनींना वटपौर्णिमेचा हळद-कुंकू, ओटी भरणे आणि गप्पा यासह साजरा करायला मिळाला. सगळे सगळीकडे आनंदी-आनंद गडे असे वातावरण पाहायला मिळाले. गर्दीही मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
तर काही महिलांनी आपल्या घरातल्याच पाटावर रांगोळीचे वटवृक्ष काढून घरातल्या घरात साधी पूजा केली. तर काहींनी घरात लावलेल्या रोपट्याचा पासून तयार झालेल्या छोट्या छोट्या झाडांचे पूजन करून आधुनिक वटपौर्णिमा साजरी केली. यावेळी आईसोबत आलेल्या चिमुकल्यांनीही मजा लुटली.
यंदा भरपुर सुना-लेकी जमल्या
कोरोनामुळे गेली दोन वर्ष उदासीन असा सण साजरा करावा लागला. मात्र, यंदा वटपौर्णिमा सण साजरा करताना कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. गेल्यावर्षी थोड्या अंशी का असेना मास्कचे बंधन होते. मात्र, यावर्षी ते नाही. त्यामुळे वटपौर्णिमा उत्साहाने गप्पा करत आनंदाने असा सण साजरा करता आला, अशा भावना शेटफळ हवेली मधील महिलांनी व्यक्त केल्या.