
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्राच्या ठिकानि काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनचा कामचुकारपणा हा पुन्हा चर्चेत आला आहे.अधीकारी व कर्मचाऱ्यांनच्या कामचुकारपणा बाबदचे निवेदन दि 13 रोजी टेंभापुरी धरण बचाव कृती समितीचे राहुल ढोले यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिले आहे.दौऱ्याच्या नावाखाली अधिकारी व कर्मचारी हे आरोग्यकेंद्राकडे फिरकत नसल्या कारणाने रुग्णांची गैर सोय ही सतत होत आहे या प्रकाराला आळा बसावा म्हणून प्रत्येक ठिकाणी बायोमेट्रिक प्रणाली द्वारे हजेरी घेण्याच्या सूचना संबंधितांना जिल्ह्या आरोग्य अधिकारी सर्वच टी.एच.ओ.आणि वैद्यकीय अधिकारी यांना पत्र काढून निर्देश देण्यात यावे आणि ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक वर जेवढी हजेरी असेल तेवढ्याच दिवसांचे वेतन देण्यात यावे व मशीन खराब तसेच मी बाहेर होतो व दौऱ्यावर होतो अशी कारणे सांगत असेल तर उलट तपासणी करावी त्यामुळे या कामचुकारपणा करणार्यांना त्वरित आळा बसेल असे ढोले यांनी निवेदनात म्हटले आहे.
संबधीताना जिल्हा आरोग्य अधिकारी सर्वच टीएचओ आणि वैद्यकीय अधिकारी यांना पत्र काढून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदविण्याचे निर्देश देण्यात यावे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिकवर जेवढी हजेरी असेल, तेवढ्याच दिवसांचे वेतन देण्यात यावे व मशीन खराब, मी बाहेर होतो, दौऱ्यावर होतो, अशी कारणे सांगतानाही उलट तपासणी करावी. त्यामुळे रोजच आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी उपस्थित राहून सेवा देतील.
राहुल ढोले
टेंभापुरी धरण बचाव कृती समिती
वेळेवर हजर न राहणाऱ्या तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे जेणे करून जनसामान्यांना न्याय मिळेल.कारण असे खूप वेळा झाले जेव्हा रुग्णांना उपचाराची गरच आहे व अधिकारी व कर्मचारी गैर हजर आहे प्रशासनाने या बाबींचा त्वरित विचार करावा.
सुभाष अरगडे
भेंडाळा येथील नागरिक