
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
लोहा:-सलग आठ वर्षापासून कंधार लोहा तालुक्यात सौ. प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या कडून विविध वृक्षांची लागवड केली जाते.पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून असो की वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या प्रत्यक्ष वृक्ष लागवड करत असतात.
वटपौर्णिमेच्या निमित्ताने लोहा व कंधार येथे त्यांनी आज
‘एक वृक्ष एक जीवन’ हे ब्रीद घेऊन शेकडो वटवृक्ष रोपा चे वाटप केले.व सुनेगाव येथील प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे वृक्ष लागवड केली.
यावेळी त्या बोलताना म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाची कामगिरी बजावत असतात परंतु अलीकडे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे अशावेळी आपण एक पाऊल जन सहभागातून पर्यावरण समतोलाकडे पाऊल टाकायला हवे प्रत्येकांनी ‘माझे वृक्ष माझे जीवन’ समजून वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करावे. आणि एक दिवस आपल्या भविष्यासाठी द्यावा असं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्ररेखाताई गोरे सौ. वैशालीताई प्रवीण चिखलीकर, सौ.कल्पनाताई मुकदम, सौ.सुरेखाताई वाले,सौ.शोभाताई बगाडे,सौ.सविता सातेगावे, सौ. सुनंदाताई वंजे,सौ.कल्पनाताई गीते, सौ.वंदनाताई डुमणे, सौ. रुक्मिणीताई गोरे, सौ.मैनाताई गोरे, सौ.कल्पनाताई मामडे,सौ. स्वप्नाताई यन्नावार, सौ.प्रणिता पापीनवार,सौ.सरपंच सुनंदाताई गाडेकर यांच्यासह लोहा कंधार शहरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.