
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
धनेगाव :- नांदेड तालुक्यातील धनेगाव येथील श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत गाडगेबाबा महाराज यांची दिंडी दिनांक १५/०६/२०२२ रोजी दुपारी १२ वाजता निघणार आहे. तरी अन्नदान व पिण्याच्या पाण्याची सोय नांदेड जिल्हाचे खा. श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचा तर्फे अन्नदान व नांदेड दक्षिणचे आ. श्री. मोहन अण्णा हंबर्डे साहेब यांच्याकडून पिण्याच्या पाण्याचा टॅकर तसेच नांदेड उत्तरचे आ. श्री. बालाजीराव कल्याणकर यांच्याकडून अन्नदान व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडी २० जून २०२२ सोमवार पर्यंत आळंदी येथे पोहचेल जर कोणी भाविक भक्त राहिले असतील त्यांनी सोमवार पर्यंत आळंदी येथे यावे असे दिंडी चालक धनंजय माधवराव जाधव महाराज धनेगावकर यांनी कळविले आहे. संपर्क साधा ७८८८१०१५५४