
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
घुग्घुस येथील नगर परिषेदेची सार्वत्रिक निवडणूक 2022 करीता प्रारूप सदस्य पदाच्या आरक्षणाची माहिती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.१३ जुन २०२२ सोमवार रोजी घुग्घूस नगर परिषेद कार्यालयाच्या पंटागनात नागरिकां समक्ष उपविभागीय अधिकारी व नायबतहसीलदार यांनी निवडणूक आरक्षणाची सोडत लहान मुलीच्या हस्ते काढण्यात आलेली आहे.
या नगर परिषेदमध्ये एकूण 11 प्रभाग असून सदस्य संख्या 22 आहे व सन 2011 प्रमाणे घुग्घूस या गावाची मतदार लोकसंख्या 32654 एवढी आहे. यामध्ये एससी 8741, एसटी 1645, ओबीसी व ईतर 22268 आहे.
(प्रभाग1) मतदार 3082 असून
(अ) अनु.जाती महिला
(ब )सर्वसाधारण,( प्रभाग 2)मतदार 2806
(अ)सर्वसाधारण महिला
(ब )सर्वसाधारण,(प्रभाग 3)मतदार 2976
(अ)अनु.जाती महिला
(ब )सर्वसाधारण,(प्रभाग 4)मतदार 2980
(अ)सर्वसाधारण महिला
(ब ) सर्वसाधारण,(प्रभाग5)मतदार 3189
(अ )अनु.जाती महिला
(ब )सर्वसाधारण,(प्रभाग6)मतदार 2565
(अ)सर्वसाधारण महिला
(ब ) सर्वसाधारण,(प्रभाग7)मतदार 3122
(अ )सर्वसाधारण महिला
(ब )सर्वसाधारण, (प्रभाग8) मतदार 2854
(अ)अनु.जाती सर्वसाधारण (ब )सर्वसाधारण महिला(प्रभाग9)मतदार 3068
(अ )अनु.जाती
(ब )सर्वसाधारण महिला(प्रभाग10)मतदार 3174
(अ )अनु.जाती
(ब )सर्वसाधारण,(प्रभाग11)मतदार 2838
(अ)अनु.जाती
(ब )सर्वसाधारण महिला
अशा प्रकारे प्रभाग रचना,आरक्षण व 11 प्रभागात 11 महीला आहे.
यावेळी घुग्घुस शहराचे नागरिक, सर्व पक्षीय नेते व घुग्घुस नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.