
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
नीरा नरसिंहपूर भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने घातलेले थैमान यामुळे आनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते. या सर्व भागाची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दौरा रविवार दिनांक 12 रोजी होऊन या भागातील पावसाने नुकसान आलेल्या पिकांची पाहणी केली तात्काळ तहसीलदारांना दिलेल्या आदेशामुळे सर्व शेतकऱ्यांचे शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करून पंचनाम्याला सुरुवात झाली.
बावडा विभागाचे मंडल अधिकारी सर्कल उदयसिंह कदम यांच्या सहित सर्व तलाठी एस.टी बिराजदार, सुरज पाठमास,, आशोक कांबळे,, राजाभाऊ पिसाळ,,अमोल हझगुडे,, हे सर्व अधिकारी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बावडा नीरा नरसिंहपूर भागातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी तातडीने सुरुवात झाली.
#चौकट::- नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली परंतु तातडीने लवकरच मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी,,
#चौकट:-बावडा मंडल अधिकारी कदम यांची प्रतिक्रिया,, म्हणाले की सर्व पिकाची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकाचा फोटो काढून नावासहित पंचनामा करून शासन दरबारी आम्ही पाठवत आहोत.
——————————————–