
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची समजली जाणाऱ्या
सुरवड गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ पायल बाबासाहेब भोसले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर अतुल सुळ यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
अशी माहिती निवडणूक अधिकारी श्री आबनावे यांनी दिली. सरपंच सौ.योगीता ताई तुकाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री आबनावे यांनी काम पाहिले. या प्रसंगी अतुल सुळ यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जहिर करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. योगिता ताई तुकाराम शिंदे , मा सरपंच मा श्री बाळासाहेब प्रल्हाद घोगरे , सदस्य प्रदिप वसंत काबळे, सदस्य रावसाहेब ऊत्तमराव घोगरे, सदस्य आण्णा साहेब साहेबराव घोगरे सदस्य सोनाली तात्या साहेब कोरटकर , गिताअंजली संजय कोरटकर, सदस्या प्रियंका धनाजी वाघ, सदस्य प्रियंका राहुल म्होपरकर , भाऊ साहेब आबनावे,तुकाराम शिंदे, धनाजी वाघ,राहुल म्होपरकर, विठ्ठल शेंडगे, सजय कोरटकर, गणेश ढेरे , राहूल सुळ आदी ग्रामस्त उपस्थित होते.
बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी अतुल सुळ यांचे अभिनंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अतुल सुळ हे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असुन, येथून पुढे ही मा.श्री.हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे निवडीनंतर सुरवड गावचे नवनिर्वाचित उपसरपंच अतुल सुळ यांनी सांगितले.