
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यातील काटी या ठिकाणी सर्व महिलांनी वटपौर्णिमा ही आपल्या देशी वृक्षाची लागवड करून साजरी केली, तर नक्कीच सात जन्म काय पिढ्यानपिढ्या आपण पाहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होऊन पर्यावरणाचा होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास थांबू शकतो. त्याचप्रमाणे देशी स्वरूपाचे वृक्ष लागवड केल्याने तापमानामध्ये झालेली वाढ निश्चितच काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न महिला करू शकतात. हा आत्मविश्वास वटपौर्णिमेनिमित्त सर्व महिलांनी घेतला तर नक्कीच एक नवा आदर्श येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असे मत इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी व्यक्त केले .
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वटपौर्णिमेच्या निमित्ताने हिरकणी महिला स्वयं साह्यता बचत गट यांच्या वतीने काटी येथे विविध स्वरूपाच्या झाडांचे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी छायाताई पडसळकर, प्रमिला शेंडे, वैशाली व्यवहारे, सोनाली राऊत, वैशाली शेंडे, विजया पडसळकर, द्रोपदा मोहिते अर्चना मोहिते, केतकी पडसळकर व हिरकणी महिला स्वयं सहाय्यता बचत गटाच्या वतीने हा संकल्प केला आहे.