
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवी सरकार इंगळी
पालघर येथे कोकण महिला राज्यस्तरीय साहित्य मोठ्या उत्साहात पार पडले. संमेलनास मा.सौ,मेघना साने ,चित्रपट अभिनेत्री,सवीता मालपेकर,लेखिका,मधुरा वेलनकर साटप,आम,सौ,निलमताई गोरे उप सभापती विधानपरिषद,मा,आम.राजेंद्र गावित उपस्थित होते.
संमेलनात कवि,लेखिका डिझायनर सौ,प्रिंयाका मोरे पालघर यांनी आपल्या कलादालनात कनव्हास,स्टोन,मधूबणी,मिरर,म्युरल,रांगोळ्या,ग्लास,मंडल अश्या अनेक प्रकारच्या रांगोळ्या,विविध प्रकारे हस्तकलेच्या दर्जेदार कलाकृतीचे प्रदर्शन मांडले होते. अनेक नामवंतांनी त्यांच्या स्टॉलला भेटी दिल्या.व वस्तू ही खरेदी केल्या.त्यात आम,निलमताई गोरे खा,सुप्रिया सुळे,सविता मापलेकर सौ,मधुरा वेलनकर साटम वमान्यावर यांनी भेटी दिल्या.
संमेलनात बहारदार कवियत्री यांनी वेगवेगळ्या कविता सादर करून रशिकांची मनेजिंकली. त्यात सौ,प्रियांका मोरे,नीलिमा पाटील, सौ,सुवर्णा पाटील, सौ,ममता चंबळ,सौ,विभूती ठाकरे,सौ,साधना भानूशाली,या वाड्यातील कवियत्रीनी स्वरचित रचना सादर केल्या.दोन दिवस साहित्य संमेलनात विविध कार्यक्रम पार पडले.