
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वेगवेगळ्या क्षेत्रातील करीअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत .तुटवडा हा संधीचा नाहीच मुळात गरज आहे ती त्या त्या उपलब्ध संधी नुसार आवश्यक ती गुणवत्ता आणि शिक्षण तो दर्जा आपल्या मध्ये निर्माण केला पाहिजे.
ऐकावे जणाचे करावे मनाचे सल्ले देणारे मार्गदर्शन करणारे अनेक आहेत . परंतु काय ऐकायचं आणि काय दुर्लक्षित करून पुढे जायचं हे मात्र सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे .या वयात शरिरात निर्माण होणारी उर्जा योग्य कारणासाठी आणि योग्य दिशेने दुरदृष्टी ने कारणी लावुन स्वतःच आयुष्य घडवा .घडी गेली तर पिढी जाते . योग्य वेळ व्यर्थ घालवू नका पश्चात्ताप करण्याची वेळ स्वतःवर येणार नाही याची दक्षता घ्या .शिक्षणाचा गोंधळ म्हणा कि व्यवस्थेची चुक म्हणा आपल्या कडे दहावी बारावी उत्तीर्ण होई पर्यंत सुद्धा करिअर संबंधी फार गांभीर्याने पाहिले जात नाही.अपवाद एम बी बी एस इंजिनियर चा आहे फक्त दहावी बारावी च्या दरम्यानच्या कालावधीत आपण डॉक्टर , इंजिनियर होऊ शकतो . एवढं आपल्याकडं महित आहे . पण जे झाले नाही त्यांचं काय दहावी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढं काय करायचं हा वैचारिक गोंधळ अनेक पालक आणि विद्यार्थी तणा तणावाचे मुख्य कारण सध्या आहे आणि पुढे काय हा गहन प्रश्न समोर उभा आहे .दहावी , बारावी चे निकाल सध्या लागले आहेत उत्तीर्ण झाले त्या सर्वांचे प्रथम अभिनंदन व अन् उत्तीर्ण झाले आहेत त्यांनी फार खेद न मानता उत्तीर्ण होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावेत नैराश्य निर्माण करून घेऊ नये किंवा वेगळा निर्णय घेऊ नये यश अपयश हे जीवनात चालत असत . सगळ्यात प्रथम गोंधळाची स्थिती निर्माण होऊ देऊ नका आपण अपेक्षित गृहित धरलं तसा निकाल आला असेल नसेल यावर चिंतन करू नका इतरांनी काय केले किंवा करायचे आहे याचा पण विचार करू नका अनेक पालक आणि विद्यार्थी यांच्या मध्ये विसंवाद विसंगती आहे . एकंदरीत शिक्षणाचा गोंधळ म्हटले तरी चालेल काही पालक यांना तर काहीच खबर नाही पाल्य काय करतोय हे सगळं मजेशीर आहे पण सत्य आहे . मुळात जो विद्यार्थी त्याच स्वतः मत भुमिका काय आहे त्याला कोणत्या विषयात किंवा करीअर संबंधित कोणत्या क्षेत्रा मध्ये रस आहे स्वारस्य आहे ते क्षेत्र निवडावे .इतरांच ऐकुन प्रभावित होऊन कुणी म्हटलं म्हणून निर्णय घेऊ नये . तुम्ही जीवनाच्या टर्निंग पॉइंट वर उभं आहेत इथुन दिशा बदलणार आहे आणि म्हणूनच योग्य दिशा ठरवा . गोंधळाच्या मनस्थितीतुन बाहेर या . प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता वेगळी त्याच्या मध्ये असणारे कालागुण वेगवेगळे आहेत इतरांसारखे घडणयाच प्रयत्न करण्यापेक्षा स्वतः च्या सुप्त गुणांना वाव द्या . योग्य नियोजन, दुरदृष्टी, प्रचंड आत्मविश्वास, नियोजन बद्ध मेहनत, एकाग्रता, अचुक टायमिंग, प्रगल्भ निर्णयक्षमता,जीवना विषयी सकारात्मक दृष्टिकोन, योग्य संगती, सुसंस्कारित आचारण, या सर्व बाबी लक्षात ठेवुन कोणतंही क्षेत्र निवडा पण ते तुमच्या स्वतःच्या योग्य निर्णय क्षमतेवर निवडा आणि त्यामध्ये नावलौकिक मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करा . इतरत्र आजुबाजूला काय चाललंय हे दुर्लक्षित करून तुमचं धेय्य गाठा . घडण्याच आणि बिघडणयाच हेच वय असतं .या वयात थोडीफार नैसर्गिक हवा पण बदलते म्हणून थोडं वेगळं वाटत शरीरात एक वेगळी उर्जा संचारते या उर्जाला योग्य दिशेने वापरले तर नक्कीच आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ सार्थक होऊ आणि हि ऊर्जा चुकीच्या कार्यासाठी वापरली तर मग मात्र आपल्याला जीवनातील कधीही भरून निघणार नाही असं नुकसान होईल .आपलं योग्य निर्णय योग्य दिशा, दुरदृष्टी , परिस्थिती ची जाण , ह्या सर्व बाबी क्षणोक्षणी मनावर बिंबवुन मार्गक्रमण करा यशस्वी व्हाल या मध्ये शंका नाही.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301