
दैनिक चालु वार्ता आटपाडी प्रतिनिधी- दादासो वाक्षे
आटपाडी तहसील कार्यालय हे घाणीचे साम्राज्य झाले आहे. कार्यालयात येणारे नागरिक हे दुर्गंधी मुळे त्रस्त झाले आहेत. मुताऱ्यांची आणि शौचालयाची तसेच जिणे यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याची व्यवस्था आणि शौचालयाची लाईटही विस्कळीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. दुसऱ्या मजल्यावरील शौचालयांना टाळे ठोकण्यात आले आहेत. प्रशासनाला वेळोवेळी सूचना देवुनही अजूनपर्यंत कोणतीही सोय उपलब्ध झाली नाही. प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत असून त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. या समस्यांचे निराकरण प्रशासन करणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.