
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे ज्येष्ठ नागरिक कै. गोविंदराव आनंदराव धुमाळ उर्फ दादा यांचे वयांच्या ८५ वर्षी पुणे येथे लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आज पहाटेच्या सुमारांस घेतला अखेरचा श्वांस. गोविंदराव आनंदराव धुमाळ उर्फ दादा यांचा स्वभाव, शांत मनमिळाऊ असा होता करंजखोप गावांमधील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. कै.गोविंदराव आनंदराव धुमाळ उर्फ दादा त्यांच्या पश्चांत पत्नी, दोन मुली व एक मुलगा, सुन नातवंडे असा त्यांचा परिवार होता. दादांची इच्छा खूप मोठी होती माझ्या एकुलत्या एक मुलांने अधिकारी, साहेब व महाराष्ट्र शासन विभागांमध्ये माझ्या मुलांने नोकरी करावी. अशी दादांची इच्छा होती पण दादांची इच्छा त्यांच्या मुलांने ती पूर्ण केली. शेतकरी कुटुंबातील श्री. हनुमंत गोविंदराव धुमाळ साहेबांनी काबाडकष्ट करीत चांगला अभ्यास घेवुन प्राथमिक ,माध्यमिक शिक्षण घेत त्यांनी आपली वन विभागांमध्ये कर्तव्यदक्ष सेवा बजावली. त्यांनी पर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये नोकरी बजावली. गोविंदराव आनंदराव धुमाळ उर्फ दादा यांच्या जाण्यांमुळे धुमाळ कुटुंबावर व करंजखोप गावासह पंचकोशीवर शोककळा निर्माण झाली . त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये पंचक्रोंशीतील तसेच कोरेगांव तालुक्यांतील राजकीय ,सामाजिक धार्मिक , शैक्षणिक तसेच त्यांचे करंजखोप भूमीतील सर्व जुने मित्रमंडळी आदीं ग्रामस्थ मंडळी उपस्थिंत होते. यावेळी करंजखोप ग्रामपंचायतीच्या वतीने व उपस्थिंतीत सर्व ग्रामस्थ तसेच हनुमंत धुमाळ साहेब यांचे सर्व वन विभागांतील अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी यांनी पार्थिवांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी गोविंदराव धुमाळ यांचा मुलगा हनुमंत धुमाळ साहेबांना अश्रूं अनावर झाले यावेळी उपस्थितांचेही डोळे भरुन आले. धुमाळ साहेबांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करीत आपल्या वडिलांना भडाअग्नी दिला.