
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – शिंदखेड राज्या येथून जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली अभिवादन रथयात्रेचे दि 15 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे जंगी स्वागत करण्यात आले. ही रथयात्रा जन्मभूमी सिंदखेडराजा ते रायगड (पाचाड) येथील जिजाऊच्या समाधीस्थळी जाणार असल्यामुळे पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांनि यावेळी दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी गंगापुर तालुक्याच्या वतीने या जिजाऊ रथ यात्रेचे क्रेन च्या माध्यमातून पुष्पहार घालुन फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले, या कार्यक्रमाचे नियोजन देविदास पाठे,संकेत मैराळ,नवनाथ काकडे, गजानन गायकवाड,सचिन भोगे,यांनी केले होते,रथ यात्रेच्या स्वागतासाठी ऍड,दत्ता पानकडे,कल्याण गायकवाड,आणसाहेब गायकवाड,दिलीप गवळी,हरिभाऊ म्हस्के,पुरुषोत्तम पदार,विशाल गायकवाड,हरिभाऊ माळी,अविनाश शिंदे,संजय गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,भाऊसाहेब गवळी,संतोष पंढुरे,योगेश चव्हाण,नानभाऊ सोनवणे,बाळू उचित गणेश सोनवणे,श्याम गाडेकर,पंकज बिरुटे,राहुल दहितुले, प्रकाश गवळी, आबासाहेब निरफळ,ज्ञानेश्वर इष्टके,मुकेश मिसाळ,प्रशांत गवळी, शुभम सोनवणे,कल्पेश गायकवाड, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होती, या कार्यक्रमाला भेंडळ्याचे माजी सरपंच ज्ञानेश्वर सवाई,सावंत क्रेन चे राजेंद्र सावंत, संतोष बोरुडे,नितीन कठाळे,बाळू शिंदे यांनी विशेष सहकार्य केले,तर गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला