
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
जिवती
तालुक्यातील आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्था जिवतीची मागील काही दिवसांपूर्वी निवडणूक झाली यात गोंडवाना गणतंत्र पार्टी चे 13 पैकी 13 उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त करत सोसायटी वर आपला झेंडा फडकवला.
आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड झाली त्यात चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या तथा जिवती नगरपंचायतीच्या नगरसेविका सतलूबाई गोदरू पाटील जुमनाके यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते गणेश राठोड यांची निवड करण्यात आली.
ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, कोर कमेटी अध्यक्ष पांडुरंगजी जाधव, गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब भाई शेख, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक ममताजी जाधव यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली.
या वेळी आदिवासी विविध सहकारी कार्यकारी संस्थेचे सर्व नवनियुक्त संचालक उपस्थित होते.