
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर प्रतिनिधी –
माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन 2022 मध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेत विवेक वर्धनी उच्च माध्यमिक विद्यालय देवणी तालुका देवणी जिल्हा लातूर येथील विद्यार्थिनी कु कासले राजनंदिनी रामदास या विद्यार्थिनीने 93 टक्के गुण मिळवून देवणी तालुक्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे तिच्या या उज्वल यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक वृंद राष्ट्रीय ओबीसी युवा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन बोराडे लातूर जिल्हा ओबीसी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुदाम पिनाटे श्री विश्वकर्मा विकास महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदाम पांचाळ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेलचे उदगीर शहर अध्यक्ष सुधाकर दापकेकर टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र राज्याचे खाजगी विद्यालयाचे मुख्य ॲडमिन बालाजी सुवर्णकार सदस्य पंडित पांचाळ बालाजी पांचाळ प्रा.शशिकांत जाधव संजय पांचाळ नरेंद्र कठारे प्रकाश भंडारे गौसोदिन तांबोळी नामदेव सूर्यवंशी नामदेव जावरे, डॉ शरद तेलंगाने किशोर डबेटवार मुख्याध्यापिका जरीना पठाण यांनी तिचे अभिनंदन केले असून तिच्या या उज्वल यशाबद्दल देवणी तालुक्यात तिचे व तिच्या आईवडिलांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.