
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वेग किती सुसाट आहे . किंवा मंद आहे या पेक्षा दिशा सुयोग्य आहे कि नाही याला खुप महत्व आहे . जगातील सगळ्यात शक्तिशाली वेगवान बाब सुद्धा अयोग्य दिशेने गतिमान झाली तर सुयोग्य ठिकाणी पोहचण्याची सुताराम शक्यता नसते .जीवनाच्या संघर्षमय प्रवासात आपल्या सोबत कोण आहे किंवा नाही तसेच आपल्या कडे सर्व सेवा सुविधा आहेत किंवा नाहीत याला शुन्य महत्व आहे दिशा योग्य असेल आणि सोबत कोणीही नसलं आणि आपण एकटे जरी असलो तरी सुद्धा आपण मनोवांछीत धेय्य ठिकाण हे गाठणारच .आणि आपल्या सोबत कोणीही असल किती हि बलाढ्य शक्ति आपल्या सोबत असली किंवा कोणाचाही पाठिंबा आपल्याला असला तसेच आपल्या मागे सृष्टी वरील सगळ्यात प्रबळ शक्ती ने पाठबळ जरी उभे केले . आणि नेमकं आपली दिशा हि मात्र अयोग्य असेल तर काहीच उपयोग होत नाही .हा इतिहास आहे वास्तविक सत्य आहे .म्हणून जीवनात योग्य ठिकाणी पोहोचायचं असेल किंवा प्रत्येक बाबी मध्ये यशस्वी होयच असेल तर मात्र आपली दिशा सुयोग्य असण खुप महत्वपूर्ण आहे . आवश्यक आहे .गरजेचं आहे म्हणून
साधारणतः आपल्या जीवनातील मुख्य अडचण हिच आहे कि आपण दिशा पाहत नाही.तर संसाधन पाहतो .पाठबळ पाहतो . आपल्याकडं काय उपलब्ध आहे.तसेच आपल्या सोबत कोण कोण आहे . कोण कोण नाही हे पाहते .व आणखी आपल्या पाठीशी किती पाठबळ उभा करता येईल यावरच आपण खल करत असतो .आपलं मंथनही चालू असतं मुख्यत्वे आवश्यकता हि आहे कि दिशा सुयोग्य आहे कि नाही हे निश्चित करण्याची असते .हजारे लाखोंच पाठबळ असणाराही अयोग्य दिशेने निघाला तर सुयोग्य ठिकाणी पोहचु शकत नाही . म्हणून आपल्या पाठीशी काय आहे काय नाही याला फार महत्त्व नाहीच आपल्या जवळ जे आहे त्याच्या सामर्थ्यवर सार्थ विश्वासावर व आपल्याकडील उपलब्ध संसाधन च्या आधारावर जर प्रवासाला सुरुवात केली तर अशा वेळी मात्र आपल्याला कोणतंही संकट वादळ आपल्या इच्छीत ठिकाणी पोहचण्या पासुन रोखु शकत नाही . आणि यदकादाचित जर आपण अपयशी झाले तर मग मात्र आपल्याला सोबत असणारी शक्ति,ताकद संसाधन ,पाठबळ मग ते वेगवेगळ्या प्रकारचे तरी आपण कमी पडलो. तर मग आपण नेमकं कुठे कमी पडलो .तर याच उत्तर आहे कि आपली दिशा हि अयोग्य होती . म्हणून आपण यशस्वी होऊ शकलो नाही . आणि एखाद्याकडे कुठलही संसाधन ,पाठबळ, सेवा , सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्याने आपल्या धेय्या प्रति प्रवास चालू केला आणि तो योगायोगाने यशस्वी झाला तर मग याठिकाणी नक्की काय चमत्कार झाला असे आपण मानतो . पण यामध्ये असं काहीच चमत्कार घडलेला नसतोच तर एक सुवर्ण मध्य सत्य हेच आहे कि ज्याची दिशा योग्य होती तो कुठल्याही सहकार्य शिवाय कुठल्याही मदतीशिवाय फक्त योग्य दिशेच्या विश्वासावरच यशस्वी झाला .हे अंतरीम सत्य आहे म्हणून आपल्या आजूबाजूला काय आहे नाही मागे कोण आहे नाही हे काहीच महत्वाचे मुद्दे नाहीत .तर आपली दिशा योग्य आसण आवश्यक आहे.
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301