
दैनिक चालु वार्ता पारनेर प्रतिनिधी-विजय उंडे
कर्जुले हरेश्र्वर/पारनेर:- पानी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेच्या निमित्ताने सोयाबीन डिजिटल शेतीशाळा व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी शेतकरी शेतीशाळा कर्जुले हरेश्र्वर येथे आयोजित करण्यात आली होती.
कर्जुले हरेश्र्वर येथील जय हनुमान शेतकरी गट आयोजित या शेती शाळेत पुर्व मशागत, बियाणे निवड,उगवण क्षमता तपासणी,बीज प्रक्रिया या विषयांवर पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक सन्माननीय श्री अभिजित गोडसे सर तसेच श्री चैतन्य ढोरमले सर यांनी मार्गदर्शन केले.
टाकळी ढोकेश्वरचे कृषी मंडळ अधिकारी सन्माननीय श्री बनकर सर यांनी बियाणे निवड,उगवण क्षमता,बीज प्रक्रिया,बी.बी.एफ.यंत्राने पेरणी,पेरणीचे अंतर, फवारणी इ.गोष्टींवर सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी पानी फाऊंडेशनचे पारनेर तालुका समन्वयक श्री गोडसे सर, चैतन्य ढोरमले सर, कृषी मंडळ अधिकारी श्री बनकर सर, कृषी पर्यवेक्षक कोरडे साहेब, कृषी सहाय्यक जाधव साहेब, कृषी सहाय्यक योगेश रोहोकले साहेब हे मान्यवर उपस्थित होते.
या शेतीशाळेसाठी जय हनुमान शेतकरी गटातील सर्व शेतकरी व प्रसिद्ध उद्योजक गणेशशेठ कोकाटे,मेजर जगन्नाथ शिर्के,पोपट दरेकर मेजर,दाते मेजर साहेब,माजी सरपंच साहेबराव दादा वाफारे, माजी मुख्याध्यापक श्री दाते सर, प्रसिद्ध बैलगाडा मालक शिवाजी शेठ उंडे, सुनील उंडे, गणपतशेठ बबन वाफारे,बबनशेठ उंडे, सुनील वाफारे, आदिनाथ वाफारे, शांताराम वाफारे,भुमीपुत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव आंधळे, विठ्ठल वाफारे, शब्बीर पठाण (ग्रामपंचायत कर्मचारी), पंढरीनाथ दाते, रामदास आंधळे, अविनाश शिर्के, अशोक कोकाटे मेजर, सचिन शिर्के,लहुशेठ वाफारे, बाळासाहेब उंडे,लक्ष्मण दाते, डॉ.अनिल कोकाटे, सुकदेव रोकडे, शिवाजी शिंदे, रोहिदास मुळे, संदिप आंधळे तसेच ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.