
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- मौ.गंगाहिप्परगा ता अहमदपूर जि लातूर येथील बळीराजा विद्यालयाचा 100% निकाल लागला तसेच गावातील सर्व नागरीक, सरपंच, उपसरपंच, चेअरमन , पोलिस पाटील,सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी विद्यार्थ्यांना व शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच
मार्च 2022 एसएससी बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागला असून विशेष प्रावीन्यासह 14 विद्यार्थी उतीर्ण.शाळेतून 93%गुण घेऊन कु.कदम श्रुती हणमंत ही प्रथम आली .92%गुण घेऊन कु.कदम वैशाली व्यंकट ही द्वितीय आली .88.80%गुण घेऊन ची.चामवाड संभाजी रविंद्र हा तृतीय व मुलात प्रथम आला .
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शिवगंगाताई कदम ,सचिव प्रा.गलाले सर ,मुख्याध्यापक शेकडे सर ,स.शि.कदम सर, कांबळे सर,सुरकुटे सर,थगनर सर,सूर्यवंशी सर,सोगेवाड मोहन , सौ.बेंबडे मॅडम व समस्त गावकरी मंडळी यांनी केले