
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -किशोर वाकोडे
दि.१८.प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यासाठी नवीन निकषांना सामोरे जावे लागणार आहे.निकषांत मुंडे टीव्ही फ्रीज सारख्या सुविधा असणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ नाकारला जाणार आहे. केंद्र शासनाच्या नवीन निकषामुळे घरकुलाचा प्रतीक्षेत असलेल्या नवीन लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न भंगणार आहे. या नवीन निकषामुळे आदिवासी भागात असंतोष निर्माण झाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामसभेत ठराव मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ दिला जात होता.मात्र केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून नव्याने आलेल्या परिपत्रकात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना नव्याने काढण्यात आलेल्या या नवीन निकषाना सामोरे जावे लागणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2022 पर्यंत बेघर असलेल्या सर्वांसाठी घरे देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी पंतप्रधान आवाज योजना अंतर्गत घरकुल मंजूर करताना केंद्र शासनाने राज्य विभागाला तेरा निकष लागू केले आहे. यापुढे पंचायत समिती ना घरकुल मंजूर करताना या तेरा निकषात बसणाऱ्यांना घरकुल मंजूर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नवीन निकषामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरणार आहे. महाराष्ट्र राज्यात घरकुलांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या आजही काही लाखांच्या घरात आहे. ही कुटुंब झोपडीत राहून उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र सद्यस्थितीत या कुटुंबियांच्या झोपडी त पंखा टीव्ही आदी या सुविधा उपलब्ध असल्यामुळे नवीन निकषामुळे लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करता येणार नाही. यामुळे पंतप्रधान योजनेअंतर्गत घरकुलाचे स्वप्न पाहणारे लाभार्थ्यांना नवीन निकषामुळे स्वप्नच राहणार.न
नवीन निकष असे आहेत
दुचाकी, मासेमारी यांत्रिकी बोट, शेतीची आधुनिक अवजारे, 50 हजार रुपयांचे किसान क्रेडिट कार्ड, दरमहा दहा हजार रुपये उत्पन्न, आयकर भरणारे, व्यवसाय कर भरणारे, टीव्ही/ पंखा /फ्रिज/ टेलिफोन, एक हेक्टर पेक्षा अधिक शेती, दुबार पीक घेणारे शेतकरी, असे तेरा निकष ठरविण्यात आले आहेत. अशा निकषात बसणारे यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात येऊ नये. अशा सूचना पंचायत समिती ना केंद्रांकडून देण्यात आल्या आहेत.