
दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
अल्पवयीन मुली वरती बलात्कार करुन दगडाने ठेचुन हत्या!
जव्हार– अतिप्रसंग करुन दगडाने ठेचुन हत्या केलेल्या जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील पिडीत कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी केली असल्याची माहीती दि १८ जुन वार शनिवार रोजी मिळत आहे.पिडीत मुलगी ही आदिवासी समाजातील असुन एक हुशार व गुणवान मुलगी अशी त्याची ओळख होती.
जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील पिडीत अल्पवयीन मुलगी नुकतीच चांगल्या गुणांनी १० वी पास झाली असुन कळी उमलण्या अगोदरच तिचा जीव घेतल्याने माझे मन दु:खी झाले असुन सदर घटनेचा मी निषेध करत आहे असे यावेळी प्रकाश निकम म्हणाले.
पूढे माध्यमांशी बोलताना प्रकाश निकम म्हणाले की,शाहु फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात घडलेली ही घटना दुर्दैवी असुन जोपर्यंत पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मी पिडीत कुटुंबियांच्या पाठीशी राहून न्याय मिळवून देईन.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याशी संपर्कात राहून आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करेन असेही प्रकाश निकम यावेळी म्हणाले आहे.यावेळी त्यांनी सांत्वन करत पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.
पिडीत कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर जव्हार पोलीस स्टेशन येथे आरोपीस लवकर पकडुन कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी गेले असता गुन्ह्याचा तपास अंतिम टप्यात असुन आरोपीस कठोर शिक्षा होईल याची दक्षता घेतली जाईल अशी माहीती जव्हार पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लिंगरे यांनी दिली.यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी हे देखील उपस्थित होते.दरम्यान जर तपास अंतिम टप्यात असेल तर इतक्या जलदगतीने तपास लावल्याबद्दल मी प्रकाश निकम पोलीस विभागाचे अभिनंदन करतो व सदर खटला फास्ट ट्रॅक मधुन चालवून पिडीतेला जलद गतीने न्याय मिळावा अशी मागणी मी करत आहे असेही यावेळी प्रकाश निकम म्हणाले
दरम्यान पिडीत अल्पवयीन मुलगी ही जव्हार तालुक्यातील जामसर वडपाड्याची असुन अतिशय प्रतिकूल परीस्थितीत १० वी ६८ टक्क्याने पास झाली असुन अतिशय गुणवान अशी मुलगी होती.१४ तारखेला ती शेतात गेली असुन दुपारपर्यंत घरी आली नाही म्हणून तिच्या आईने शोधाशोध सुरु केली.मात्र ती न आढळल्याने तिची आई घाबरली व सायंकाळी पिडीत मुलीचे दोन मामा व चुलत भावाने पुन्हा शोधाशोध सुरु केली.तरी देखील न सापडल्याने १५ तारखेला पिडीताच्या नातेवाईकांनी जव्हार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.
रिजल्ट बघण्या अगोदरच अतिप्रसंग करुन अक्षरश: दगडाने ठेचुन विद्रुप करुन पिडीताचा जीव घेतल्याने प्रकाश निकम यांनी हळहळ व्यक्त करत सदर दुर्दैवी घटनेचा निषेध केला आहे.तसेच सर्वांनी पिडीत कुटुंबाच्या पाठीशी राहून सहकार्य करण्याचे आवाहन प्रकाश निकम यांनी यावेळी केले आहे.
तसेच सदर गुन्हा फास्ट ट्रकमध्ये चालवण्याची मागणी यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.