
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम ;-तालुक्यात कृषी दिन व हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
१ जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली जाते. त्याप्रमाणे भूम तालुक्यात
शासकीय . निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली तर कृषी दिनानिमित्त पंचायत समितीच्या परिसरात गटविकास अधिकारी भागवत ढवळशंख व उपस्थित सर्व कर्मचारी ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामसेविका .आशा कार्यकर्ती. ग्रामपंचायत सदस्य . बचत गटाच्या कार्यकर्त्या आदींच्या उपस्थिती वृक्षारोपण करण्यात आले.