दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी . साताऱ्यांतील अंजठा चौकामध्ये शहर पोलीस ठाण्यांतील गुन्हे प्रगटीकरण विभागांचे डीबी पथकांचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना संशयापद फिरणाऱ्या युवकांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली असता त्यावेळी त्यांनी चोरीची कबुली दिली चोरीची दोन्ही वाहने बारामती तालुक्यांतील असल्यांचे समोर आले असून संशयित सातारारोड ता. कोरेगाव) येथील आहेत. किशोर हनुमंत माने वय २० रा. तडवळे व शिवराज संतोष फाळके व १९सध्या रा. सातारारोड ता. कोरेगांव अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अंजठा चौकांत सातारा शहरांचे डीबी पथकांचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पल्सर व विना क्रमांकाच्या दुचाकीवर दोघेजण आढळून आले यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवून कागदपत्रांची मागणी करताच ते निरुत्तर झाले त्यामुळे पोलिसांना त्यांचा चांगलाच संशय आला. पोलिसांनी दोघांना ताब्यांत घेवुन शहर पोलीस ठाण्यांत आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी बारामती तालुक्यांतील वडगांव निंबाळकर हद्दीमधून पल्सर व बुलेटची चोरी केल्यांची कबुली दिली. यावेळी सातारा पोलिसांनी वडगाव निंबाळकर पोलिसांची संपर्क साधुन अधिक माहिती घेतली असता याच वर्षात दोन्ही वाहने चोरी झाल्यांचे तपासांत समोर आले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून या टोळीमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा आता सातारा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे,सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती.आँचल दलाल मॅडम पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, सुजित भोसले, अविनाश चव्हाण ज्योतीराम पवार, पंकज ढाणे,अभय साबळे, गणेश घाडगे आधी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला
